जलनयात देवपूजेनंतर देवालाच गंडा, चोराला अटक

जलनयात देवपूजेनंतर देवालाच गंडा, चोराला अटक


जालना : मंदिरात देवाची पूजा करून नंतर चोऱ्या करणाऱ्या आरोपीला जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलीय. सहा मंदिरात चोऱ्या केल्याची कबुली या आरोपीने दिलीय. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे पूजेचं साहित्य आणि घरफोडीची हत्यारं सापडली आहेत. 

जलनयात देवपूजेनंतर देवालाच गंडा, चोराला अटक

चोरांच्याही एक एक भन्नाट आयडिया आणि कल्पना असतात. जालन्यातला एक चोर तर सगळ्यात भारी निघाला. हा चोर फक्त देवळातच चोरी करायचा. चोरी करण्याचीही त्याची स्टाईल भन्नाट आहे. बाबासाहेब वांगे नावाचा हा चोर देवळात आधी पूजा करायचा. देवाला नमस्कार केल्यानंतर देवाचे दागिने किंवा दानपेटीवर डल्ला मारायचा. त्यानं एक दोन नव्हे तब्बल सहा मंदिरांमध्ये चोऱ्या केल्या होत्या, अशी माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिलीय. 

देवाला नमस्कार केला म्हणून देव माफ करेल, अशी बहुतेक या चोराची भावना असावी. देव जरी मोठ्या मनाचा असला तरी कायदा सुव्यवस्था राखणारे पोलीस मात्र दयाळू मयाळू नव्हते. त्यांनी या चोराला गजाआड केलंय. आता कोठडीत गेल्यानंतर तरी चोरी न करण्याची देव त्याला सुबुद्धी देईल ही अपेक्षा.

Post a Comment

0 Comments