उदयनराजे भोसले खासदारकीचा देणार,भाजप प्रवेश निश्चित,

उदयनराजे भोसले खासदारकीचा देणार,भाजप प्रवेश निश्चित, 

उदयनराजे भोसले


राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जात आहे. उदयनराजे आज लोकसभा अध्यक्षांकडे आपल्या खासदारीकीचा राजीनामा देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उदयनराजे हे दिल्लीत जाणार आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत उद्या उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खा . उदयनराजे भोसले यांचा भाजप पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १४ सप्टेंबरला दिल्लीत हा प्रवेश होणार आहे.

उदयनराजे भोसले यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज आणि बोलण्या, वागण्याच्या अनोख्या शैलीमुळे उदयनराजे भोसले नेहमीच चर्चेत असतात. राष्ट्रवादीत असतानाही ते कधीही पक्षाच्या चौकटीत अडकले नाहीत. मी पक्षबिक्ष मनात नाही, हे वाक्य त्यांनी अनेक वेळा सुनावले, असे असतानाही त्यांनी तीन वेळा राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढली.

Post a Comment

0 Comments